Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

केवळ विकासकामांच्या जोरावरच भाजपला यश : रामप्पा चिवडशेट्टी...

Solapur South, Solapur | Feb 10, 2026
वळसंग जिल्हा परिषद गटातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले भाजपचे उमेदवार रामप्पा चिवडशेट्टी यांनी आपल्या विजयानंतर मनोगत व्यक्त केले. भाजपने गेल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात राबवलेल्या विकासकामांमुळेच मतदारांनी पक्षावर विश्वास ठेवला आणि भाजपच्या अनेक उमेदवारांना भरघोस यश मिळवून दिले, असे ते म्हणाले. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी भाजपने सातत्याने प्रयत्न केले. या विकासकामांचा थेट लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचला असून, त्याच कामांची पोचपावती मतदारांनी निवडणुकीच्या माध्यमातून दिली आहे, असेही चिवडशेट्टी यांनी स्पष्ट केले.