📍आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च! 🚔
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर शहरात शांतता, सुव्यवस्था व सुरक्षिततेचा संदेश देत पोलिसांचा भव्य रूट मार्च काढण्यात आला.
📍गणेशोत्सव उत्साहात, शांततेत, शिस्तीत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही अफवा अथवा अपप्रचारावर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर! 🚔🙏
#JalgaonPolice #RaverPolice #Raver #Ganeshotsav2026 #RouteMarch Jalgaon Police GanpatiBappaMorya श्रीगणेशोत्सव जळगावपोलीस रावेर रूटमार्च
Jalgaon, Maharashtra | Sep 23, 2026