कवठे महांकाळ: आरेवाडीमध्ये भरदिवसा सहा ते सात जणांच्या टोळीकडून एकाचे अपहरण
कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे आज (28 मे) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास धक्कादायक अपहरणाची घटना घडली. सहा ते सात जणांच्या टोळीने भररस्त्यात एकाला जबरदस्तीने बोलेरो गाडीत कोंबून मारहाण करत अपहरण केल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.सदर घटना बिरोबा बनाजवळ घडली. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले की, बोलेरोसोबत एक नवी स्कॉर्पिओ देखील होती. या टोळक्याने रस्त्यावरच वादावादी करून एका व्यक्तीला मारहाण केली.