नेवासा: आ.लंघे यांच्या पाठपुराव्याला यश ; मंत्री विखे यांचा आदेश
आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मुळा धरणातून उजव्या कालव्याद्वारे नेवासा तालुक्यातील शेतीसाठी सोमवार ५ जानेवारी पासून आवर्तन सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.