Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
मंत्री

चिखली: अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एक ठार, एक गंभीर जखमी, मेहकर-चिखली मार्गावरील घटना

Chikhli, Buldhana | Dec 11, 2025
मेहकर-चिखली रोडवरील नांद्रा धांडे फाट्याजवळ बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. बुलढाणा येथील धनंजय तुकाराम कळसकर (३५) आणि अमोल सुभाष ओहळ (३२) हे दोघे एमएच 28 BL 7045 क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यांना तातडीने मेहकर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु धनंजय कळसकर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अमोल ओहळ यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे.
चिखली: अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एक ठार, एक गंभीर जखमी, मेहकर-चिखली मार्गावरील घटना - Chikhli News