शाळा सुरू होण्याआधीच धक्कादायक चित्र! प्रशासन झोपेत?
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या वाळुंज गावातून धक्कादायक चित्र समोर आले आहे. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे साचले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर संकट निर्माण झाले आहे.
परिसरात दुर्गंधी पसरली असून डास, माश्या आणि विविध साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
एकीकडे स्वच्छता अभियानाचे दावे केले जात असताना दुसरीकडे शाळेसमोरचे हे वास्तव प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. पालक आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट असून शाळा सुरू होण्यापूर्वी कचरा हटवला नाही तर तीव्र आंदोलन छ
Pune City, Pune | Jun 14, 2026