नागपूर शहर: नागपुरात सुरक्षा रक्षकाचे अपहरण; मालमत्तेसाठी बांधले ओलीस : सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी, पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी सिंगा रेड्डी यांनी 10 जुलै ला सायंकाळी 6:30 ला दिलेल्या माहितीनुसार मालमत्तेच्या वादातून ५९ वर्षीय सुरक्षा रक्षक रमेश सदाशिव कुमरे यांचे अपहरण करून त्यांना रात्रभर फार्महाऊसवर ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात रमेश कुमरे यांनी स्वतःचा भाऊ जनार्दन कुमरे आणि इतर साथीदारांवर पोलिसांत तक्रार दिली आहे.आरोपींनी मिळून रमेश कुमरे यांना जबरदस्तीने एका कार्यालयात नेले आणि त्यानंतर त्यांना फार्महाऊसवर डांबून ठेवले होते.