परतूर: पाण्याच्या टाकी परिसरात आढळला 2 दिवसापासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह, कचऱ्याच्या गाडीत मृतदेह नेण्याची पोलिसांवर वेळ
Partur, Jalna | Jun 7, 2026 आज दिनांक 7 जून 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतूर शहरातील पाण्याच्या टाकी परिसरामध्ये काल दिनांक 6 जून 2026 रोजी शहरातील पाण्याच्या टाकी परिसरामध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुरेश डाकारके या तरुणाचा मृतदेह आढळून आला याची माहिती पोलिसांना देण्यात आली परतुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह कचऱ्याच्या गाडीत टाकून नेत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे त्यामुळे पोलिसांच्या व नगर परिषदेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली जात आहे.