पुणे : ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास अधिक परतावा मिळेल, या आमिषाला बळी पडून एका नागरिकाची तब्बल ८ लाख ५८ हजार ६१० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदाशिव पेठ येथील ३४ वर्षीय इसमाने टेलिग्राम आणि इतर मोबाईल अॅपद्वारे लिंक पाठवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. टास्क पूर्ण करण्याचे सांगून टप्प्याटप्प्याने रक्कम घेतली. मात्र नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. विश्रामबाग पोलीस ठाण्यात भा.दं.सं. ३१९(२), ३१८(४) आणि आयटी अॅक्ट ६६(डी)