दारव्हा: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही गणेशपूर पारधी तांडा वासियांना प्यावे लागते जनावराच्या हौदातील पाणी#jansamasya
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा नंतरही दारव्हा तालुक्यातील गणेशपूर (पारधी तांडा) येथील रहिवासी आजही शुद्ध पाण्यासाठी झगडत आहेत. गणेशपूर, पारधी तांडा आणि गौळपेंड या गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या या गावात शुद्ध पाण्याची मूलभूत सुविधा नाही. शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या अगदी जवळ असूनही या गावकऱ्यांना जनावरांसोबत एकाच हौदावर पाणी भरावे लागते.