❤️ जागतिक हृदय दिन – २९ सप्टेंबर ❤️
"हृदयाचा प्रत्येक ठोका महत्त्वाचा!"
3.2k views | Gondia, Maharashtra | Sep 29, 2026 ❤️ जागतिक हृदय दिन – २९ सप्टेंबर ❤️ "हृदयाचा प्रत्येक ठोका महत्त्वाचा!" आपले हृदय निरोगी असेल तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत हृदयाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आजच स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला निरोगी जीवनशैलीची भेट द्या! 🩺 हृदयविकाराची लक्षणे दुर्लक्षित करू नका: छातीत दुखणे किंवा दडपण येणे श्वास घेण्यास त्रास होणे किंवा अचानक घाम येणे चक्कर येणे, मळमळ किंवा उलटी होणे जबडा, मान, खांदा किंवा हाताकडे वेदना पसरणे (लक्षणे दिसताच विलंब न करता तात्काळ वैद्यकीय मदत घ्या!) 🥗 हृदय निरोगी ठेवण्यासाठी सोपे नियम: आहारात ताजी फळे व भाज्यांचा समावेश करा नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवा मीठ मर्यादित प्रमाणात घ्या, तेलकट व प्रक्रियायुक्त अन्न टाळा ताणतणाव कमी करा, पुरेशी झोप घ्या तंबाखू, धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे टाळा नियमित आरोग्य तपासणी करा सार्वजनिक आरोग्य विभाग गोंदिया