नागपूर ग्रामीण: बोखारा येथे आढळले नवजात अर्भक; परिसरात उडाली खळबळ
पोलीस स्टेशन कोराडीच्या हद्दीतील बोखारा गावात रस्त्याच्या कडेला एक नवजात अर्भक आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.माहिती मिळताच कोराडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.पुढील वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी नवजात बालकाला तातडीने शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हे बाळ कोणाचे आहे आणि ते तेथे कोणी टाकले, याचा कसून शोध सध्या कोराडी पोलिसांकडून घेतला जात आहे.