🚨 गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी मंडईत PMCची धडक कारवाई!
गणेशोत्सवाला अवघा एक दिवस बाकी असताना पुणे महापालिकेने महात्मा फुले मंडई परिसरात रात्री उशिरा अतिक्रमणविरोधी कारवाई केली.
रविवारी रात्री सुमारे 10.30 वाजता झालेल्या कारवाईत अनधिकृत पत्र्याचे शेड, रस्त्यावरील स्टॉल, हातगाड्या आणि सार्वजनिक जागेवरील इतर अतिक्रमणे JCBच्या सहाय्याने हटवण्यात आली.
गणेशोत्सवाच्या काळात मंडई परिसरात हजारो भाविकांची गर्दी होणार असल्याने पादचाऱ्यांना होणारा त्रास आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
📍 शनिपार ते रामेश्वर चौक
📍 मंडई पोलीस चौकी परिसर
📍 अखिल मंडई गणपती परिसर
📍 टिळक पुतळा ते काका हलवाई
या भागात अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांसाठी उपलब्ध जागा कमी झाल्याने विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून समस्या कायम असताना गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशीच कारवाई का? असा सवाल काही स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
तुमच्या परिसरातही अशाच प्रकारे अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास होत आहे का?
कमेंटमध्ये तुमचा परिसर सांगा. 👇
#Pune #PuneNews #PuneBreakingNews #PuneUpdates #PuneCity #PMC #PMCPune #PuneMunicipalCorporation #MahatmaPhuleMandai #PuneMandai #Mandai #Encroachment #EncroachmentDrive #PMCAction #PuneCivicNews #PuneLocalNews #Ganeshotsav #Ganeshotsav2026 #PuneGaneshotsav #Ganpati #GanpatiBappa #PuneTraffic #MaharashtraNews #MarathiNews #MarathiNewsChannel #PuneNewsMarathi #TimesOfMaharashtra #TimesOfMaharashtraNews
Pune City, Pune | Sep 15, 2026