Pune बनावट Google Pay-PhonePe ॲपचा फसवणुकीसाठी वापर! पेमेंटचा स्क्रीनशॉट दाखवून दुकानदारांना गंडा
पुणेकरांनो सावधान! पुण्यातील कॅम्प परिसरातील 'एक्सक्यूज मी' कपड्यांच्या दुकानातील व्हिडिओच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Google Pay आणि PhonePe वर पेमेंट केल्याचा बनावट स्क्रीनशॉट दाखवून दुकानदारांची फसवणूक केली जात असल्याचा दावा करण्यात येत आहे.
व्यापारी आणि दुकानदारांनो, ग्राहकाच्या मोबाईलवरील स्क्रीनशॉट किंवा हिरव्या टिक मार्कवरच विश्वास ठेवू नका. तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री करा किंवा साऊंड बॉक्सवरील पेमेंट अलर्ट तपासा. या प्रकाराची पुणे पोलीस आणि सायबर सेलने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
#Pune #PuneNews #OnlineFraud #GooglePayFraud #PhonePeFraud CyberCrime PunePolice CyberSafety ShopkeepersAlert TimesOfMaharashtra