विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने साई येथे राबविण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा समारोप उत्साहात पार पडला. आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनातून व सौ. अदिती अमित देशमुख यांच्या पुढाकारातून राबवलेल्या या उपक्रमात ६३ महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षक क्रांती उफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी शिलाई, कटिंग व डिझाइनचे कौशल्य आत्मसात केले.