उमरखेड पोलीस स्टेशन अंतरगटबतिवडी शिवारातील पैनगंगा नदीच्या पात्रात 15 ऑक्टोबर रोजी पाण्याच्या प्रवाहात एक अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता. ड्युटीवर असलेले फिर्यादी पोलिस हेड कॉन्स्टेबल दिलीप चव्हाण यानं नदीत तरंगत असलेले प्रेत दिसल्याने त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात कळवले. याप्रकरणी प्रथम मार्ग दाखल करण्यात आला. परंतु सदर प्रेताच्या दोन्ही हातांना स्कार्फने बांधलेले असून, डोक्यावर मार लागल्याचे प्राथमिक निरीक्षणात दिसून आले.