📢 पालकांनो लक्ष द्या! 14ते 15वर्षांच्या मुलींना 'एचपीव्ही' लस द्या, कर्करोगापासून सुरक्षित करा!
704 views | Nanded, Maharashtra | May 23, 2026 नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. महिलांमध्ये वाढता गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) रोखण्यासाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण हाच सर्वोत्तम उपाय आहे. आरोग्य विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या 14- 15वर्षे वयोगटातील मुलींचे लसीकरण नक्की करून घ्या. ही लस अत्यंत सुरक्षित असून मुलींच्या निरोगी भविष्यासाठी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी (PHC) त्वरित संपर्क साधा. #NandedNews #PublicApp #HealthUpdate #HPVलसी