कन्नड: एसडीएम कार्यालयात आमदार संजना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पाणंद योजनेची बैठक,शेतकऱ्यांच्या अडचणींना मिळणार दिलासा
कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालयात आमदार संजना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे राबविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत योजना गावागावात गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने सुरू करण्यावर भर देण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सुलभ दळणवळण सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.