परतूर: वलखेड येथे पावसाचे पाणी व नालीचे पाणी मुख्य रोडवर ग्रामपंचायत कार्यालयाचे दुर्लक्ष
Partur, Jalna | Jul 5, 2026 आज दिनांक 5 जुलै 2026 वार रविवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील वलखेड येथे पावसाचे पाणी व नालीचे खराब पाणी मुख्य रोडवर व गाव गल्ली परिसरात वाहून येत असल्याने या मुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून ग्राम पंचायत कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे, आणि यामुळे गावकऱ्यांना पावसाळ्यात आजार होण्याची शक्यता वाढली आहे, या सर्व बाबीकडे ग्रामपंचायत कार्यालयाने वेळीच लक्ष देऊन गावात स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे.