हातकणंगले: हुपरीमध्ये पाण्याच्या टाकीत पडून कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात विकी विद्याधर कांबळे या कर्मचाऱ्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आला आहे. हुपरी पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.