CII केरळ ‘आयुर्वेद क्षेत्रातील भागधारक संवाद’
आज केरळमधील कूथट्टुकुलम येथील श्रीधारीयम आयुर्वेदिक आय हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे CII केरळच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आयुर्वेद क्षेत्रातील भागधारक संवाद’ कार्यक्रमात सहभागी झालो.राजा बळींची पवित्र भूमी आणि आयुर्वेदाची समृद्ध, प्राचीन परंपरा लाभलेल्या केरळच्या या पवित्र भूमीला नमन केले.या कार्यक्रमाला CII केरळ, CII नॅशनल आयुष कमिटीचे मान्यवर पदाधिकारी तसेच वैद्यरत्नम्, आर्य वैद्यशाळा कोट्टक्कल, नागार्जुना, केरळ आयुर्वेद, धात्री, बिप्हा, सीताराम यांसारख्या प्रमुख संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच AMAI, AHMA, AMMOI आणि मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हलशी संबंधित विविध भागीदारांचाही सहभाग होता.या बैठकीत आयुष, शिक्षण, संशोधन, क्रीडा वैद्यक, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्यसेवा, धोरणात्मक सुधारणा आणि उद्योगासमोरील आव्हाने यांसह विविध महत्त्वपूर्ण विषयांवर अत्यंत फलदायी चर्चा झाली.आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली आयुष क्षेत्राचा अर्थसंकल्प चार पटीहून अधिक वाढला आहे, देशभरात १२,५०० हून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरे उभारण्यात आली आहेत आणि आयुर्वेदाची पोहोच १५० हून अधिक देशांमध्ये झाली आहे. विकसित भारत २०४७च्या संकल्पपूर्तीसाठी आपला संकल्प स्पष्ट आहे,‘स्वस्थ भारत’ हीच विकसित भारताची भक्कम पायाभरणी असेल आणि या स्वस्थ भारताला आयुर्वेदाची समर्थ साथ असेल.
@followcii @pinarayivijayan @ministryofayush @ccras_moayush @nmpb1
@pibayush @aiia_gov
#ayushministry #ayurveda #ciikerala #shreedhareeyam #keralawellness
Delhi, India | Oct 5, 2026