सेलू तालूक्यात बिबट्याचा वावर असल्याची पाऊलखुणावरून तसेच पशूधनावर होत असलेले हल्ले यावरून शक्यता नाकारता येत नाही. नागरीकांनी बिबट्याचा वावर आहे हे समजूनच शेतातील कामे करावीत. जेणे करून बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव करता येईल. मात्र काही लोक फेक व्हिडिओ व फोटो बनवून समाजमाध्यावर व्हायरल करत आहेत, संबधित फेक व्हिडिओ टाकणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.