शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शालेय परिवहन समितीची बैठक संपन्न
मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. पोलीस उपायुक्त (मुख्यालय) श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 30/06/2026 रोजी पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर येथे शालेय परिवहन समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीस उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. नंदकिशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) श्री. संजय खताळे, पोलीस निरीक्षक श्रीमती दीप्ती ब्राह्मणे, श्री. निलेश गावंडे, श्री. वैभव पानसरे, शालेय परिवहन समितीचे सदस्य तसेच जिल्हा स्कूल बस चालक-मालक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहनात बसवू नयेत, खाजगी वाहनांतून अनधिकृत वाहतूक टाळावी तसेच शालेय वाहनांमध्ये स्पीड गव्हर्नर, अग्निशमन यंत्र, प्रथमोपचार पेटी व संकटकालीन दरवाजा सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी शाळा परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच सर्व पालक, वाहन चालक व शालेय परिवहन समितींनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
#amravaticitypolice
135 views | Amravati, Maharashtra | Jun 30, 2026