समुद्रपूर: सावंगी झाडे येथिल पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष समीर धोटे यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
समुद्रपूर :तालुक्यातील सावंगी (झाडे ) येथील पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष समीर रामकृष्ण धोटे वय ४४ यांनीआपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. पत्नी ही मुलींच्या शिक्षणासाठी हिंगणघाट येथे त्यांच्यासोबत राहत असताना २९ जानेवारी ला रात्रीखोलीत झोपायला गेला आणि सिलिंग पंख्याला फासी लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळी ३० जानेवारी सकाळी ८ वाजता आई वडील त्याला उठवायला गेले असते हा प्रकार उघडकीस आला आहे.