समुद्रपूर: शेडेगाव शिवारात आढळला ३० ते ३५ वयोगटातील व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु
समुद्रपूर तालुक्यातील शेडेगाव शिवारात कुजलेल्या अवस्थेत अज्ञात इसमाचा मृत्यदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली शेडेगाव शिवारात ईस्माईल समडोये यांचे शेता जवळ कुजलेल्या अवस्थेत अज्ञात इसमाचा मृत्यदेह असल्याची माहिती पोलिसांकडून आज ३० जानेवारी प्राप्त झाली आहे या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृत्यदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविला यासंबंधी २९ जानेवारीला रात्री १०.३० वाजता समुद्रपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.पुढील तपास ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.