समुद्रपूर: किन्ही (खर्डा) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५६ वा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
समुद्रपूर :बाल युवा ध्यान प्रार्थना मंडळ किन्ही (खर्डा) व समस्त किन्ही ग्रामवासी यांच्या तर्फे आयोजित मानवतेचे महान पुजारी "वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज" यांचा "५६" वा पुण्यस्मरण सोहळा अर्थात सर्व संत स्मृतिदिन अती उत्साहात संपन्न झाला.त्या निमित्ताने या ५ दिवसात विविध उपक्रम घेण्यात आले होते.रोज सकाळी ग्राम स्वच्छता अभियानाने सुरुवात करून नंतर घटस्थापना व ग्रामगीता ग्रंथाचे पूजन करून सामुदायिक ध्यान व राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली .