भुसावळ: भगवान झूलेलाल यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी अमित बघेल यांच्यावर कारवाईची मागणी
सिंधी समाजाचे देव झूलेलाल भगवान यांच्या विरोधात जोहार छत्तीसगढ पार्टी, बिलासपूरचे कार्यकर्ते अमित बघेल यांनी वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य सिंधी समाजाच्या भावना दुखवणारे असून अमित बघेल याच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन दि. ५ नोव्हेंबर रोजी सिंधी समाज बांधवांतर्फे भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांना देण्यात आले.