अंबड: उद्या अंबडमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी संधी—तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर!
Ambad, Jalna | Apr 16, 2026 उद्या अंबडमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी संधी—तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर! अंबड : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्या, दिनांक 17 एप्रिल (शुक्रवार) रोजी "मागेल त्याला सोलार" योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा महावितरणच्या उपविभागीय कार्यालय, अंबड येथे पार पडणार असून, यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या प्रलंबित समस्या आणि तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची मोठी संधी मिळणार आहे. सोलार योजनेत अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना कराव