समुद्रपूर: नंदोरी परिसरातील वादळाच्या तडाख्याने नुकसान झालेल्या घरांची आमदार समीर कुणावार यांनी केली पाहणी
समुद्रपुर तालुक्यातील नंदोरी परीसरातील गावांमध्ये २७ मे रोजी ४ वाजताच्या सुमारास वादळाने तांडव करीत अनेक नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून त्यांचा संसार उघड्यावर आणला आहे.या नुकसानीची माहिती मिळताच हिंगणघाट विधानसभा श्रेत्राचे आमदार समिरभाऊ कुणावार यांनी आज शुक्रवारी १ वाजता नंदोरी परीसरातील वादग्रस्त गावांना भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून झालेल्या नुकसानीची पुरेपूर भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.