समुद्रपूर: कोरा गावातून ८ महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीचे अपनयन करणाऱ्या आरोपी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथून अटक
गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिल्ली येथिल २६ वर्षीय आरोपीने ८ महिन्यापुर्वी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्राम वरून ओळख करून नंतर तिचेशी प्रेमसंबंध स्थापित करून तिचे कोरा गावावरुन पलायन करणाऱ्या आरोपी निखिल बंडुजी सातपुते वय २६ वर्ष रहणार सिल्ली यास पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथून २९ मे रोजी २ वाजता अटक केल्याची माहिती आज ३१ मे रोजी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.या संबंधी पुढील तपास ठाणेदार संदिप गाडे करीत आहे.