समुद्रपूर: मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिलादीनी गावातील कर्तबगार महिलांचा सन्मान
समुद्रपुर तालुक्यातील मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलिस पाटील मेघाताई धोटे,प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य प्रणालीताई वांढरे, बचत गटाच्या सिआरपी संगिताई लाटनकर, पोस्ट विभागाच्या स्मिताई घोडमारे, अर्चनाताई कोटमकर सरपंच विलास नवघरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अनिल धोटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.