समुद्रपूर: गिरड खुर्सापार रस्त्यावर वाघाच्या हल्ल्यात गाय ठार: शेतकऱ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान, आतापर्यंत परिसरात ९ जनावरे ठार
गिरड खुर्सापार रस्त्यावर शेतकरी वसंता राणे यांच्या मालकीची ५० हजार रुपये किंमतीच्या गायीवर वाघाने गायीवर हल्ला चढवित जागीच ठार घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांना मिळताच त्यांनी आपले कर्मचारी वनरक्षक निता डडमल,वनरक्ष पि.डी बेले,यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केले.यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ योगेश राघार्तै यांनी शवविच्छेदन केले.यावेळी अमृत आखूड,रंगनाथ कुंभारे व शेतकरी राणे हजर होते. घटनास्थळी वाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी वनविभागाच्या वतीने ट्रॅप कॅमेरे बसवले आहे