समुद्रपूर: मोहगांव ग्रामपंचायतीला आरोग्य विभागाच्या वतीने टि.बी.मुक्त घोषित केल्याबद्दल राबविण्यात आले विविध कार्यक्रम
आरोग्य विभागाच्या वतीने टि. बी. मुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. मोहगांव ग्रामपंचायत कार्यालय आरोग्य विभागाच्या आदेशानुसार टि. बी. मुक्त ग्रामपंचायत अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच विलास नवघरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून मिशन समृद्धीचे समन्वय अक्षय देशमुख, ग्रामसेवक संतोष पुरकाम, गौतम बोदेले, शिक्षक सुदाम थोरात ,आरोग्य सेविका विशाखा गोट, ग्राम संघाच्या सचिव करुणा नवघरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.