नागपूर शहर: कुख्यात गुंडाला एक वर्षासाठी हद्दपार
12 जुलैला दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सक्षम उर्फ मधुर प्रेमनाथ मौंदेकर याला नागपूर शहर व ग्रामीण भागातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असूनही वर्तणुकीत सुधारणा होत नव्हती, त्यामुळे पोलीस उपायुक्तांनी ही कारवाई केली आहे. या आदेशानुसार, तहसील पोलिसांनी त्याला हिंगणघाट येथे त्याच्या नातेवाईकांकडे सोडले आहे.