अतिवृष्टी व पूरपरिस्थितीत मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांचे घटनास्थळी नेतृत्व
रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी कशेडी घाट, खेड, चिपळूण तसेच इतर पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
कशेडी घाट परिसरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन करत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले तसेच वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांसाठी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
खेड येथे जगबुडी नदीच्या पुरामुळे बाधित भागाची पाहणी करून नागरिक व व्यापाऱ्यांशी संवाद साधत आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच चिपळूण येथील पोलीस ठाण्यात आपत्कालीन साहित्याची पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #maharashtrapolice #flooding
7 views | Ratnagiri, Maharashtra | Jul 6, 2026