पुण्यात नियम फक्त पाट्या वाचण्यापुरतेच उरले आहेत का? देशाच्या अतिसंवेदनशील सुरक्षा क्षेत्राच्या थेट नाकावर वडगाव शेरीतील 9 BRD एअर फोर्स स्टेशनसमोर हा धक्कादायक प्रकार सुरू आहे! ⚠️
पुणे मनपाने १५ सप्टेंबरला "विमानतळापासून १०० मीटर निषिद्ध क्षेत्रातील बांधकाम" असल्याचा ठपका ठेवत २४ तासांत पाडण्याची नोटीस दिली होती. कोर्टाने स्थगिती अर्ज फेटाळल्यानंतरही मनपाच्या नाकावर टिच्चून चारही बाजूंनी उंच पत्रे लावून आत कंटेनर, पक्की केबिन, पाण्याची टाकी आणि बेकायदेशीर बोअरवेल थाटण्यात आली.
२४ तासांची नोटीस देऊन ३६० तास उलटले तरी कारवाई का नाही? उद्या सुरक्षेला धोका निर्माण झाला तर जबाबदार कोण?
यावर माजी स्थायी समिती अध्यक्षांनी थेट इशारा दिलाय: "स्वतःच्या नोटीसची अब्रू राखा, हे वॉशिंग सेंटर तत्काळ जमीनदोस्त करा आणि फौजदारी गुन्हे दाखल करा, अन्यथा अधिकाऱ्यांना पुणेरी खाक्या दाखवू!"
मनपा आता कारवाई करणार की झोपेचे सोंग घेणार? �
Pune City, Pune | Sep 29, 2026