अकोला : चैतन्य नगर, खरप रोड येथील प्रगती सुनील जगताप यांनी एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवत अभूतपूर्व यश मिळवले. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अचिंत चांडक यांनी दिनांक ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांचा सत्कार केला. साध्या कुटुंबातून येत स्वअभ्यासाच्या जोरावर यश संपादन केलेल्या प्रगती सध्या नागपूर येथे गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाने असंख्य तरुणांना नवी दिशा दिली आहे.