ठाणे: वाशीत अग्नि तांडव! दिवाळी साजरी करून गाढ झोपलेल्या चार जणांचा आगीत होरपळून मृत्यू, सहा वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश
Thane, Thane | Oct 21, 2025 नवी मुंबईच्या वाशी सेक्टर क्र.14 येथे ह्रदय द्रावक घटना घडली रहेजा रेसिडेन्सी या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान आग लागली. सर्वजण गाढ झोप येत असताना अचानक आग लागली.आगीमध्ये पूर्ण इमारत वेढली गेली. यामध्ये चार जणांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला आहे, त्यात सहा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. त्यानंतर अग्निशमनदलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि शर्तीने प्रयत्न करून अनेकांना बाहेर काढण्यात आले. आगीत दहा जण जखमी झाले.