कळमनूरी: या आमदाराला घरात येऊ देऊ नये,ते आपल्या माय बहिणीवर वाईट नजर टाकतात.हिंगोली व कळमनुरीच्या आमदारांत आरोप प्रत्यारोप
जशा जशा नगरपालिकेच्या निवडणूक तारखा जवळ येऊन ठेपले आहेत तसतसे हिंगोली विधानसभेचे भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे आणि कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यात आता कलगीतुरा चांगलाच रंगलाय ते आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत,आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आरोप प्रत्यारोप केले आहेत.