नागपूर शहर: कळमना येथे चोरीचा पर्दाफाश: ५ अल्पवयीन ताब्यात : प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 11 जुलैला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी 'देवतकर स्टील इंडस्ट्रीज'मध्ये झालेली चोरी उघडकीस आणली आहे. २-३ जुलैच्या रात्री शटर तोडून चोरट्यांनी ६९,५०० रुपये किमतीचे मोबाईल आणि इतर साहित्य चोरले होते. तांत्रिक तपास करत पोलिसांनी ५ अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीचा सर्व माल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे आणि त्यांच्या पथकाने केली.