नागपूर शहर: नागपूर पुन्हा हादरले! भरदिवसा घरात घुसून अकाऊंटंटचा धारदार शस्त्राने खून
नागपुरात गुन्हेगारीचे सत्र सुरूच असून, शनिवारी भरदुपारी झालेल्या एका धक्कादायक खुनाच्या घटनेने शहर पुन्हा एकदा हादरले आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेमिनरी हिल्स येथील 'गौरखेडी कॉम्प्लेक्स'मध्ये ही घटना घडली.**अजय श्रीवास (वय ४२)** असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते प्रॉपर्टी डीलिंग आणि अकाऊंटंटचे काम करत होते. शनिवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात घुसून त्यांच्या पोटावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने सपासप वार केले.