वसई: नालासोपारा पूर्व धानीवबाग नाका येथील फर्नीचरच्या दुकानातून मोबाईलची चोरी
Vasai, Palghar | Apr 19, 2024 श्रीप्रस्थाच्या शीतल सेजल येथे राहणारे व सुतारकाम करणारे रमाशंकर विश्वकर्मा (५१) यांचा १० हजारांचा मोबाइल दुकानातून चोरी झाला आहे. बुधवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास धानिवबाग नाका येथील दुकानात ते फर्निचरचे काम करत होते. त्यावेळी दुकानात आलेल्या चोरट्याने त्यांना बोलण्यात गुंतवून टेबलवर ठेवलेला मोबाइल चोरी करून नेला आहे. पेल्हार पोलिसांनी मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.