राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक यांसह प्रमुख शहरांमध्ये हजारो कोटी रुपयांचा खर्च करून उभारलेल्या नागरी सुविधांची अतिवृष्टीने पोलखोल केली आहे. या सोयीसुविधा नेमक्या कोणत्या दर्जाच्या उभारल्या गेल्या याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, अशी टीका लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत नगर विकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान केली.