आरोग्य तुमच्या दारी – जारावंडी येथे मोफत आरोग्य शिबिर
गडचिरोली पोलीस दल व शालिनीताई मेघे रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा जारावंडी येथील आठवडी बाजारात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
100 नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात आले तसेच विविध आजार व पोषण विषयक मार्गदर्शन देण्यात आले. यापैकी 46 नागरिकांना पुढील विशेष तपासणीसाठी शिफारस करण्यात आली.
दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल सातत्याने कार्यरत आहे.
सन 2021 पासून आजपर्यंत गडचिरोली पोलीस दलाच्या माध्यमातून 205 आरोग्य मेळावे आयोजित करण्यात आले असून 43,000 हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच 4,864 युनिट रक्तसंकलन, 9,971 हून अधिक नेत्र तपासण्या आणि 1,412 मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
जनतेच्या आरोग्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव कटिबद्ध!
#GadchiroliPolice
#HealthCamp
#CommunityPolicing
#PublicWelfare
#SevaSurakshaSanskar
@mramesh_ips @dgpmaharashtra @dattameghecollegeofnursing
@cmomaharashtra
Gadchiroli, Maharashtra | Jun 21, 2026