पोस्टे पिपली बुर्गी हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके टाकून दहशत निर्माण करणाया आरोपींना गडचिरोली पोलिसांनी केली अटक
दि. 12/07/2026 रोजी पोस्टे पिपली बुर्गी पासून साधारण 5 किमी अंतरावर जिजावंडी टोलाकडे जाणाया रस्त्याच्या फाट्यापुर्वी डाव्या बाजुस असलेल्या गावाच्या दिशादर्शक फलकाच्या खालील बाजुस असलेल्या लोखंडी एंगलला एक लाल रंगाचे कापडी बॅनर तसेच त्याचे जवळच जमीनीवर दगडाखाली एक व बाजुस एक पांढया रंगाचे कागदी पोस्टर मिळून आले होते. सदर पोस्टर व बॅनरवर नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने मजकुर लिहण्यात आला होता. सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या आदेशान्वये आरोपींचा शोध घेणेकामी तपास सुरू करण्यात आला. यावरून दि. 14/07/2026 रोजी पोस्टे पिपली बुर्गी येथे अप. क्र. 01/2026 कलम 353(1) (ब), 189(2), 190, 61(2) भा.न्या.स., कलम 10, 13, 20, 39 बेकायदा कृत्य अधि. व कलम 135 महा. पो. अधि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
18 views | Gadchiroli, Maharashtra | Jul 25, 2026