राहुरी: साञळ येथे रस्ता चोरीची तक्रार; तहसीलदारांना निवेदन, ग्रामस्थांचे उपोषण सुरू
राहुरी तालुक्यातील साञळ गावाजवळ पंचक्रोशीतील सोनगाव व धानोरेला जोडणारा महत्त्वपूर्ण सार्वजनिक रस्ता JCB च्या साहाय्याने उकरून त्यातील मुरूम-मातीची रस्ताच चोरी केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकाराविरोधात ग्रामस्थांनी आज (मंगळवार) सकाळपासून उपोषणाला बसत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.