"ठाकरे बंधूंच्या सभेची उत्सुकता शिगेला;
मनसैनिक पाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मुंबईकडे रवाना"
मुंबईतील वीर सावरकर मार्गावर होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या सभेसाठी कल्याण-डोंबिवलीतून मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेकडो कार्यकर्ते लोकल ट्रेनचा प्रवास करत मुंबईकडे रवाना.
रेल्वे स्थानके आणि लोकल ट्रेनमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली; घोषणाबाजीने संपूर्ण वातावरण दणाणून गेले.
"धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झांकी है, नरेंद्र मोदी बाकी है" अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी आपला उत्साह व्यक्त केला.
भगवे झेंडे, आणि जोरदार घोषणाबाजीमुळे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये राजकीय रंग चढल्याचे चित्र दिसले.
काही वेळातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावरून कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याने समर्थकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
�
Kalyan, Thane | Jul 26, 2026