अंबड: अंबड : सोन्याच्या घोटाळ्यातील आरोपींना 9 मेपर्यंत वाढीव पोलीस कोठडी
Ambad, Jalna | May 5, 2026 अंबड : सोन्याच्या घोटाळ्यातील आरोपींना 9 मेपर्यंत वाढीव पोलीस कोठडी अंबड (प्रतिनिधी) : सोन्याच्या अफरातफर प्रकरणातील तिघा आरोपींना सुरुवातीला अटक करून अंबड येथील माननीय न्यायालयात हजर केले असता 5 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, पोलीस कोठडी संपल्यानंतर आज (5 मे) पुन्हा न्यायालयात हजर करून वाढीव कोठडीची मागणी करण्यात आली. त्यावर सुनावणी करत माननीय न्यायालयाने पुढील तपासासाठी तिघा आरोपींना 9 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.