भोकरदन: शेलुद येथील धामणा धरणामध्ये 2 टक्के पाणी, दप्तर कारकून घुले यांनी दिले शेलुद येथे माहिती
आज दिनांक 10 ऑक्टोंबर 2026 वार शनिवार रोजी दुपारी 4वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील धामणा धरणामध्ये पाटबंधारे विभागाचे दप्तर कारकून घुले यांनी माहिती दिली आहे की यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे धामणा धरणात पाणीच आले नाही, सध्या फक्त 2 टक्के पाणी उपलब्ध असून ते फक्त पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला असून, त्याचे रक्षण करण्यासाठी पथके तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.