सुधागड: पाली शहर परिसरात मोकाट कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट
पाली नगरपंचायत हद्दीत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून शहरातील हट्टाळेश्वर चौक, मुख्य बाजारपेठ, तहसील कार्यालय परिसर, जुने बसस्थानक, गांधी चौक आदी भागांत कुत्र्यांचा अक्षरशः सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दिवसाढवळ्या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मागे कुत्र्यांचे टोळके धावत सुटत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.